

Sugar Production
sakal
पुणे : राज्यातील नैसर्गिक आपत्तीचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. ऊस पिकामध्ये २१ टक्के; तर साखर उत्पादन २६ टक्क्यांनी घटले आहे. मात्र, खासगी साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणींमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी भरण्यासाठी मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) केली आहे.