मनोहर भोसले जादूटोणा आर्थिक फसवणूक प्रकरणी आणखी दोघे अटकेत

मनोहर भोसले जादूटोणा आर्थिक फसवणूक प्रकरणी आणखी दोघे अटकेत
Published on

मनोहर भोसले जादूटोणा;
आणखी दोघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी, ता. ११ : जादूटोणा व आर्थिक फसवणूक प्रकरणी भोंदू मनोहर भोसले व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी २४ एप्रिल रोजी अटक केली होती. या प्रकरणी संकेत काळे (वय २२, रा. इंदापूर) आणि राजेंद्र हुंबे (रा. मांजरगाव) या आणखी दोघांना कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना माढा न्यायालयासमोर हजर केले असता काळे याला सात दिवसांची, तर हुंबे याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तपास करत आहेत. गौतम कसबे (रा. सोलापूर) यांनी कुर्डुवाडी पोलिसांत जादूटोणा व आर्थिक फसवणुकीची फिर्याद दिली होती. त्यानंतर करमाळा पोलिसांतही काही गुन्हे दाखल करण्यात आले होते. दाखल गुन्ह्यांत आतापर्यंत मनोहर भोसले, विशाल वाघमारे, नरेंद्र सांगळे, रोहित शेलार, धिरज मनुरे, अक्षय रास्कर यांच्यासह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सारिका गटकूळ करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com