Vidhan Sabha 2019 : युती न करताही भाजप मिळवू शकते पुर्ण बहुमत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

राज्यात येणाच्या विधानसभा निवडणुकीत युती तुटणार की, राहणर याची जोरदार चर्चा सुरु असतानाच भारतीय जनता पक्षाला एक हाती बहूमत मिळेल, असा अंदाज एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सर्व्हेतून समोर आले आहे. या सर्व्हेमध्ये भाजपला स्वबळावर 176 जागा मिळतील तर शिवसेनाला 52 जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे 33 आणि 18 जागा मिळवतील असा अंदाज या सर्व्हेत वर्तविण्यात आला आहे.

विधानसभा 2019 : पुणे : राज्यात येणाच्या विधानसभा निवडणुकीत युती तुटणार की, राहणर याची जोरदार चर्चा सुरु असतानाच भारतीय जनता पक्षाला एक हाती बहूमत मिळेल, असा अंदाज एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सर्व्हेतून समोर आले आहे. या सर्व्हेमध्ये भाजपला स्वबळावर 176 जागा मिळतील तर शिवसेनाला 52 जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे 33 आणि 18 जागा मिळवतील असा अंदाज या सर्व्हेत वर्तविण्यात आला आहे.

एमआयटीच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या ओपिनियन पोलमधून ही माहिती समोर आली आहे. बहुचर्चित वंचित बहूजन आघाडीला 2 जागा मिळतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना खातेही उघडू शकणार नाही असंही या सर्व्हेत म्हटलं आहे.

 पुण्याच्या एमआरटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट तर्फे 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या दरम्यान हा ओपिनियन पोल घेण्यात आला. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या 30 विधानसभा क्षेत्रात जाऊन मतदारांशी थेट चर्चा करून हा ओपिनियन पोल तयार करण्यात आल्याची माहिती आज पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेच्या प्राध्यापकांनी दिली. 

या ओपिनियन पोल नुसार भाजपने संपूर्ण मतदानाच्या 45% मते आणि 176 जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष राहील, मागील विधानसभेत भाजपला 31% वोट शेअर आणि 122 जागा मिळाल्या होत्या, इतर तिन्ही प्रमुख पक्षांच्या मतदानाच्या टक्केवारीत घसरण झाली असून शिवसेना 19% वरून 15% वर तर काँग्रेस 18% वरून 14% वर आली आहे, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली असून राष्ट्रवादी 17% वरून 7.85% वर आली आहे. 

युती राहणार की तुटणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच हा सर्व्हे पुढे आला आहे, भाजप शिवसेनेला 100 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नसल्याच्या बातम्या पुढे आल्यापासूनच युतीबद्दल दोन्ही पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये संभम आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी भाजपात पक्षांतर केल्याने भाजपचीही डोकेदुखी वाढली असून युतीतला मोठा भाऊ म्हणून शिवसेनेची जागा व्याप्त करण्याची रणनीती भाजपा यंदाच्या निवडणुकीत आखू शकतो. 

विशेष म्हणजे चारही प्रमुख त्यांच्या पारंपारिक युतीतून लढले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित 51 जागा जिंकतील तर, भाजप-शिवसेना युतीला 228 जागा मिळतील असंही हा सर्व्हे सांगतो. युतीबद्दल अनिश्चितता असताना तिकडे आघाडीत मात्र जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस
प्रत्येकी 125 जागा लढवणार हे जवळपास निश्चित झालं असून 38 जागा या स्वाभिमानी, कवाडे गट या घटक पक्षास सात जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without the alliance, the BJP can get a full majority in Maharashtra Vidhansabha 2019