
जीवधन- नाणेघाटात परवानगीशिवाय साहसी खेळ; अॅडव्हेंचर संस्थांना दंड
जुन्नर : ऐतिहासिक किल्ले जीवधन व नाणेघाट येथे मुरबाड जि.ठाणे येथील सह्याद्री रोवर्स व सह्यगिरी अॅडव्हेंचर या संस्थाना साहसी खेळ घेणे चांगलेच महागात पडले आहे.
जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी वनपरिक्षेत्रामध्ये कोणतीही परवानगी न घेता अँडव्हेंचर अँक्टीव्हीटी घेतल्याने या संस्थाना प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपयांचा चा दंड केला आहे. घाटघरचे वनरक्षकांचा अहवाल तसेच ओम आदिवासी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मडके यांनी दिलेल्या अर्जानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी दिली.
हेही वाचा: अर्थसंकल्पाने समतोल साधला : पृथ्वीराज चव्हाण
या दोनही संस्थेकडून ६ मार्च रोजी साहसी खेळाचे आयोजन केले होते मात्र त्यासाठी किमान दहा दिवस अगोदर या कार्यालयास अर्ज सादर करणे आवश्यक होते तसेच यासाठी कार्यालयाची परवानगी न घेता अँडव्हेंचर अँक्टीव्हीटी घेतली असल्याचे स्पष्ट झाल्याने दंडाची कारवाई करण्यात आली असून घाटघर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे दंडाची रक्कम जमा करावी असे लेखीपत्र त्यांना देण्यात असले आहे.
यापुढे विनापरवाना साहसी खेळाचे आयोजन केल्याचे आढळून आल्यास भारतीय वनअधिनियम १९२७ अन्वये अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. साहसी खेळ (Adventure Activities) घेणाऱ्या संस्थांनी किमान दहा दिवस अगोदर अर्ज सादर करून याबाबतची पूर्वपरवानगी घेऊन नंतर अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे. अर्जासोबत पर्यटन व सांस्कृतीक कार्यविभाग यांचेकडील नोंदणी पत्रक व समन्वयकांचे साहसी खेळाचेचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे : अजित शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर
Web Title: Without Permission Trekking Punishment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..