वटवटे येथे कोल्ह्याला मिळाले जीवदान

वटवटे येथे कोल्ह्याला मिळाले जीवदान
Published on: 

फोटोओळ :
BEG26B02045, BEG26B02046
वटवटे : येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची वन विभागाचे कर्मचारी आणि गावातील युवकांनी सुटका केली. (दुसऱ्या छायाचित्रात) विहिरीत पडलेला कोल्‍हा.

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची १५ तासांनी सुटका
वटवटे येथील घटना; वन विभागाचे कर्मचारी अन् गावातील युवकांची संयुक्त मोहीम

सकाळ वृत्तसेवा
बेगमपूर, ता. २२ : वटवटे (ता. मोहोळ) येथे ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची वन विभागाचे कर्मचारी आणि गावातील युवकांनी १५ तासांच्या प्रयत्नांनंतर सुटका केली. रविवारी (ता. १८) ही घटना घडली.
शेतकरी आनंद हरगुडे यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या वेळी कोल्हा पडला होता. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर गावातील देविदास मडके, इक्बाल तांबोळी, दत्ता बंडगर, करण कोकरे, सोन्या डांगे यांच्यासह युवकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश न आल्याने त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला.
वनरक्षक बरसाबाई पटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी बुढन शेख आणि संभाजी आवताडे घटनास्थळी दाखल झाले. अखेर देविदास मडके यांना दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरवून बांबूला लावलेल्या फाशाच्या मदतीने कोल्ह्याला बाहेर काढण्यात आले. सुटका होताच कोल्हा जवळच्या शेतात पळून गेला.
---------------------------
प्रतिक्रिया
गावातील युवकांचे धाडस, सहकार्य आणि तत्परतेमुळे मुक्या प्राण्याला जीवदान मिळाले.
- बरसाबाई पटेकर, वनरक्षक, कामती बीट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com