PuneRains : कामावरून परतताना दुचाकीसह महिला गेली वाहून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पुण्यात पावसाने उडवलेल्या हाहाकारात नांदेड सिटी येथे राहणारी एक महिला दुचाकीसह वाहून गेली आहे. नांदेड सिटीमध्ये राहणार्‍या अमृता आनंद सुदामे या धायरी येथील पुलावरून दुचाकीवरून जाताना, पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पुणे : काल (ता.26) पुण्यात पावसाने उडवलेल्या हाहाकारात नांदेड सिटी येथे राहणारी एक महिला दुचाकीसह वाहून गेली आहे. नांदेड सिटीमध्ये राहणार्‍या अमृता आनंद सुदामे या धायरी येथील पुलावरून दुचाकीवरून जाताना, पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अमृता या नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजता कामास गेल्या होत्या, कामावरून परतत असताना रात्री साधारण साडेदहा वाजता घरी येणे अपेक्षित होते. मात्र, त्या घरी न पोहोचल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. बराच वेळ झाल्यावर काही पत्ता न लगाल्यास पोलिस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केल्यावर तब्बल 8 तासांनंतर सनसिटीच्या बाजूला असलेल्या क्रिकेटच्या मैदानावर पोलिसांना त्यांचा मृतदेह आढळून आला. 

अमृता यांच्या पश्चात आता दोन मुली आहेत. दरम्यान, काल झालेल्या पावसाने पुण्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून असंख्य नागरिकांच्या गाड्या देखील वाहून गेल्या आहेत. पुण्यात आतापर्यंत पावसाने एकूण ११ जणांचे बळी घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womam Drown With Her Bike While Returning From Work at pune heavy rain