esakal | बसमध्ये ओळख झालेल्या महिलेने 4 महिन्याचे बाळ पळवले; पुण्यातील धक्कादायक घटना!
sakal

बोलून बातमी शोधा

The woman abducted the baby from Bus in Pune

आरोपी महिलेने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर त्या दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या व तेथून हडपसरला गेल्या. तेथे दोघींनी एका हॉटेलात जेवण केले. त्यानंतर आरोपी महिलेने खाऊ आणण्याच्या बहाण्याने बाळाला फिर्यादीजवळून घेतले व त्याला घेऊन तेथून पळून गेली. ​

बसमध्ये ओळख झालेल्या महिलेने 4 महिन्याचे बाळ पळवले; पुण्यातील धक्कादायक घटना!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : बस प्रवासात ओळख झाल्यानंतर शेजारी बसलेल्या महिलेने चार महिन्यांच्या बाळाला पळवून नेण्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 19) हडपसर परिसरात घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार महिलेला शोध सुरू आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून फिर्यादींनी चार महिन्याच्या बाळाला घेऊन घरा बाहेर पडल्या. लोणीमधून ही महिला अहमदनगरला एसटी बसने गेली. त्यानंतर त्यांनी अहमदनगर ते सातारा बसने प्रवास सुरू केला. त्याचवेळी एक महिला त्यांच्या शेजारच्या सीटवर बसली. काही वेळाने त्यांच्यात थोडीशी ओळख झाल्याने त्यांनी गप्पा मारण्यास सुरवात केली. आरोपी महिलेने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर त्या दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या व तेथून हडपसरला गेल्या. तेथे दोघींनी एका हॉटेलात जेवण केले. त्यानंतर आरोपी महिलेने खाऊ आणण्याच्या बहाण्याने बाळाला फिर्यादीजवळून घेतले व त्याला घेऊन तेथून पळून गेली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बराच वेळ झाल्यानंतरही ती महिला परत न आल्याने फिर्यादी यांनी तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. त्यामुळे महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी एसटी बस स्थानक आणि इतर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी महिला बाळाला घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे.
 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image