Beatingsakal
पुणे
Uruli Kanchan Crime : तडीपार गुंडाच्या टोळक्याकडून महिलांसह त्यांच्या कुटूंबाला लोखंडी रॉडने मारहाण; आरोपी अजूनही मोकाट
दुचाकीचा धक्का लागल्याने तडीपार गुंडाच्या टोळक्याने एका कुटूंबातील सर्वांनाच लोखंडी रॉड, दगड आणि विटाने मारहाण केल्याची घटना घडली.
उरुळी कांचन - दुचाकीचा धक्का लागल्याने तडीपार गुंडाच्या टोळक्याने एका कुटूंबातील सर्वांनाच लोखंडी रॉड, दगड आणि विटाने मारहाण करत जखमी केल्याची घटना पुणे- सोलापूर महामार्गालगत थेऊर येथील राखपसरे वस्ती परिसरात बुधवारी (ता. ९) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत स्वप्नील काळभोर, सतीश काळभोर, गोटू शेंडगे, दिलीप काळभोर, जयश्री काळभोर आणि सिंधु काळभोर हे जखमी झाले आहेत.