भिगवणमधील महिलेचा कोरोनाने मृत्यू, संपर्कातील 15 जणांच्या... 

प्रशांत चवरे
Saturday, 25 July 2020

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील प्रभाग क्रमांक तीनमधील ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे हा भिगवणमधील तिसरा मृत्यू आहे. त्यामुळे भिगवणकरांना धक्का बसला आहे.

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील प्रभाग क्रमांक तीनमधील ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे हा भिगवणमधील तिसरा मृत्यू आहे. त्यामुळे भिगवणकरांना धक्का बसला आहे. यापूर्वी भिगवण स्टेशन येथील दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

पुणे झेडपीच्या सभापतींना कोरोनाची लागण

याबाबत भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन कुंभार यांनी माहिती दिली की, येथील प्रभाग क्रमांक तीनमधील ज्येष्ठ महिला आजारी होती. या महिलेस बारामती येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान या महिलेची कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली होती. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. २४) या महिलेचा मृत्यू झाला आहे. भिगवणमधील कोरोनामुळे हा तिसरा बळी आहे. या महिलेच्या संपर्कातील १५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यांच्या अहवालांची भिगवणकरांना प्रतिक्षा आहे. त्या अहवालावरून भिगवणची कोरोना वाटचाल ठरणार आहे.

पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल

दरम्यान, भिगवण येथील थोरातनगर येथील कोरोनाबाधीत व्यावसायिकांच्या संपर्कातील ३८ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे भिगवणकरांना दिलासा मिळाला आहे. भिगवण शहरांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यामुळे संपूर्ण भिगवण हे कंटेनमेंट झोन जाहिर करण्यात आले होते. आत्ता कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ३८ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या या निगेटिव्ह आल्या. त्यामुळे कंटेनमेंट झोन मागे घेऊन व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman from Bhigwan dies of corona disease