
ओझर : गोळेगाव (ता. जुन्नर) येथील पोलिस सेवेत कार्यरत असणाऱ्या मनीषा ताम्हाणे यांनी काळ्या हळद लागवडीचा केवळ १० गुंठ्यात पहिलाच प्रयोग यशस्वी केला आहे. आरोग्यासाठी बहुगुणी असणारी हळद पावडर व बियाणांपासून त्यांनी मागील सहा महिन्यात सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. बियाणे तसेच पावडरला परराज्यातूनही ऑनलाइन मागणीही वाढत आहे. यामुळे हळदीच्या शेतीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.