Pune News: वडाची वाडी परिसरात महिला रस्त्यावरच प्रसूत; रुग्णवाहिकेला वाहतूक कोंडीमुळे विलंब
Ambulance Delay: उंड्रीतील वाहतूक कोंडीमुळे मीनू चौहान या महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली. स्थानिक महिलांनी धाव घेत प्रसूती सुरळीत पार पाडली आणि कन्यारत्नाचा जन्म झाला.
उंड्री : वडाचीवाडी येथील वाहतूक कोंडीमुळे शनिवारी एका महिलेची प्रसूती रस्त्यावरच करणे भाग पडले. सुदैवाने काही स्थानिक महिला देवदूत बनून आल्याने प्रसूती सुरळीत पार पडली.