

पुणे - मनी लाँड्रिंगसह दहशतवाद्यांना निधी पुरवल्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी सिंहगड रस्त्यावरील एका ४३ वर्षीय महिलेची ३० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.