तारळे महिला दिन यशोगाथा
महिला दिनासाठी
...............................
यशवंतदत्त बेंद्रे : सकाळ वृत्तसेवा
भारत हा शेतीप्रधान देश आहे. आजही आजही शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नात वाटा मोठा आहे. मात्र अलीकडे विविध कारणांनी शेती परवडेना अशी ओरड आहे, तरीही असे काही जिद्दी शेतकरी आसपास बघायला मिळतात, की ते याच शेतीतून यशस्वीचा टप्पा गाठतात. त्यातूनच जर ती महिला असेल, तर आश्चर्य वाटायला नको. अशीच ग्रामीण भागातील महिला म्हणून अनुराधा सयाजी डफळे यांनी आपला शेती व्यवसायात ठसा उमटवला आहे.
अनुराधा यांचा जन्म तारळेतील शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासून त्या शेतीत जात होत्या. त्यामुळे आपसूकच त्यांना शेतीची आवड होती. २००६ मध्ये वजरोशी (ता. पाटण) येथील शेतकरी असलेल्या सयाजी डफळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर देखील त्यांनी पतीसोबतच शेतीत लक्ष घातले. तारळे विभाग हा डोंगरदऱ्यांचा. वजरोशी हे गाव डोंगराच्या पायथ्याला आहे. पावसाळ्यात भरपूर पाऊस व उन्हाळ्यात पाण्याची अडचण अशी स्थिती होती.
सयाजी यांची स्वतःची दीड एकर व कुटुंबाची मिळून पाच एकर शेती आहे. सुरुवातीला संपूर्ण शेती कोरडवाहू होती. पावसाळी एक पीक व रब्बीला झाला तर शाळू व हरभरा. त्यावरच भरोसा असायचा. दरम्यानच्या काळात त्यांनी बोअरवेल मारली. सुदैवाने चांगले पाणी लागले अन् मग त्यांचे रूपांतर बागायती शेतीकडे झाले. तीन एकर क्षेत्र बागायती झाले आहे. सुरुवातीला वाफा पद्धतीने व नंतर सारा पद्धतीने ते पिके घ्यायला लागले. यात चांगले उत्पन्न मिळायला लागले. त्यांचा प्रामुख्याने भर पालेभाज्या व तरकारी पिकांवर राहिला आहे. चाकवत, मेथी, कोथिंबीर, वांगे, टोमॅटो, कांदा, भेंडी, आले, मिरची ही पिके घेताना, अनुराधा दिवसभर शेतीत राबतात तर पती सयाजी हे तारळे बाजारपेठेचे गाव असल्याने तेथे मालाची विक्री करतात. उत्पादन ते थेट ग्राहक विक्री हा मंत्र जपल्यामुळे चांगले पैसे मिळतात असे त्या आवर्जून सांगतात. एक जण रानात राबणारा, तर दुसरा बाजारात विकणारा असेल, तर आर्थिक फायदा चांगला होतो. त्यांनी कधीही आपला माल हा व्यापाऱ्याला विकला नाही. यामुळेच आमचे उत्पन्न वाढल्याचे त्या आवर्जून सांगतात.
असा घडला प्रवास
बाेअरवेल मारून तीन एकर शेती बागायतीखाली
तरकारी उत्पादनांवर भर
एकाने राबायचे, दुसऱ्याने विक्री करायची हा शिरस्ता
सेंद्रीय शेतीला प्राधान्य
शेतात ठिबक सिंचन व स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी
आंतर पीक घेण्यावर जास्त भर
.............................................
B01257,
B01258
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

