PMPML Bus Accident : पीएमपी बसचालकाने फरफटत नेल्याने महिला जखमी

पीएमपी बसमध्ये चढत असताना चालकाने बसचा अचानक वेग वाढवून एका महिलेला फरफटत नेले.
woman injured after being run over pmpml bus driver pune traffic police
woman injured after being run over pmpml bus driver pune traffic policeesakal

Pune News : पीएमपी बसमध्ये चढत असताना चालकाने बसचा अचानक वेग वाढवून एका महिलेला फरफटत नेले. ही घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील लाल देऊळ बसस्थानकाजवळ सोमवारी घडली.

शमशुमनिसा हुसेन खान (वय ५७, रा. जुना मोदीखाना) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात बसचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही पीएमपी बस कोंढव्यातून पुणे स्टेशनकडे जात होती. बस लाल देऊळ बसस्थानकावर थांबल्यानंतर ही महिला बसमध्ये चढत होती.

त्यावेळी चालकाने महिलेकडे दुर्लक्ष करून अचानक बसचा वेग वाढवला. काही अंतरापर्यंत महिलेला फरफटत नेले. त्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली. चालक कानात हेडफोन घालून बस चालवत होता. पोलिस बसचालकाचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com