
मिक्सर ट्रकच्या धडकेत महिला ठार
कोथरूड - पौड रस्त्यावरील जयभवानीनगर येथे दुपारी तीनच्या सुमारास मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एक महिला मृत्युमुखी पडली. दवाखान्यात असलेल्या नातेवाईकाला भेटून सुनेबरोबर दुचाकीवरून घरी निघालेल्या रंजना गुलाबराव दाभेकर वय 60, सुतारदरा गल्ली क्रं.10 यांचा अपघातात मृत्यु झाला. त्यांची सुन मुग्धा यांच्या हाताला मार लागला आहे. अपघातामुळे त्यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मुग्धा या गाडी चालवत होत्या. मागून आलेल्या मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
प्रत्यक्षदर्शी मंगेश अवघडे म्हणाले की, डम्परने धडक मारल्याने गाडीचा तोल गेला अन चाक डोक्यावरून गेल्याने आजींचा मृत्यु झाला. या घटनेमुळे पौडरस्त्यावर मोठा जमाव जमला होता. काही काळ वाहतूक कोंडी झाली. ड्रायव्हर दारू पिवून वाहन चालवत असल्याचे लक्षात आल्याने जमावाने ड्रायव्हरला मारहाण केली. पोलिसांनी जमाव पांगवत ड्रायव्हरला पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
Web Title: Woman Killed In Mixer Truck Crash
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..