अजितदादांना पुण्याच्या महिला अधिकाऱ्याने दिल्या कोरोना मॅनेजमेंटच्या 'टिप्स'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

- रुबल अग्रवाल यांनी 'कोरोना मॅनेजमेंटच्या टिप्स दिल्या.

पुणे : एरवी बैठका गाजविणारे, अधिकाऱ्यांना फैलावर घेत; त्यांना घाम फोडणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनाच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशनच्या (पीएसडीसीएल) 'सीईओ' रुबल अग्रवाल यांनी 'कोरोना मॅनेजमेंट च्या टिप्स दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशेष म्हणजे, एक मिनिट पुढच्या व्यक्तीचे ऐकून न घेणारे अजितदादा मात्र, सलग अर्धातास मन लावून पुण्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेत राहिले. कोरोनाच्या दोन महिन्यातील प्रवासाचे 'प्रझेंटेशन' पाहून अजितदादांनी कौतुकही केले.
पुण्यात कोरोनाची व्याप्ती वाढताच अजित पवार हे स्वत: लक्ष देत अधिकारी-लोकप्रतिनिधींच्या बैठका घेत आहेत. त्यातून वेळ काढून शुकवारी अजितदादांनी सिंहगड रस्त्यावरच्या स्मार्ट सिटीच्या कार्यालयाला भेट दिली आणि आतापर्यंतचे रुग्ण, त्याच्या वाढीचे कारणे, त्यावरचे उपाय, याचे सादरीकरण पाहिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गंमत म्हणजे, अग्रवाल यांच्यासह महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना अजितदादांची 'स्टाइल' ठाऊक असल्याने या मंडळींनी आपल्या सादरीकरणाची तयारीही जोरात केली होती.
पुण्यात कोरोना कसा पसरला? तो कुठे आणि का?, मग, त्यावर कुठचे उपाय केले आणि त्याची परिणामकारकता कशी दिसते? केंद्राचे अंदाज खोटे कसे ठरले?
पुढच्या महिन्यांत कोरोनाच्या केसेस वाढती आणि त्या लगेचच कमीही कशा होतील ?...अशा प्रश्नांचा आकड्यानिशी उलगड करीत अग्रवाल यांनी अजितदादांना माहिती दिली. तरीही अजितदादांनी काही प्रश्नांत खोलवर जाऊन अधिकचा तपशील जाणून घेतला. तेव्हा, प्रत्येक छोट्या-छोट्या शंका सोडवत अग्रवाल यांनी प्रेझेटेशन संपविले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुबल अग्रवाल यांच्याकडे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदासोबत 'स्मार्टसिटी'च्या 'सीईओ'पदाची जबाबदार आहे. आपले नियमित काम सांभाळून त्या स्मार्टसिटीचे काम पाहात आहेत. मात्र कोरोनाविरोधातील लढाईत अग्रवाल यांनी 'स्मार्टीसटक्ष'चीही यंत्रणा उतरविली आहे. त्यातूनच त्यांनी खास प्रेझेंटेशन तयार केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी, नवल किशोर राम, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शहरातील कोणत्या भागांत रुग्ण आहेत, त्यांच्या वाढीचा वेग, बाधित क्षेत्र आणि त्याबाहेरील हद्दीतील रुग्ण वाढीचे प्रमाण, मृत्यू दर, मृतांची कारणे, लॉकडाउनमधील शिथिलता, त्याचे परिणाम, याची सविस्तर माहिती रुबल अग्रवाल यांनी पवार यांना दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, स्मार्टसिटीने निर्माण केलेल्या "डॅशबोर्ड'सह सर्व यंत्रणेची माहिती जाणून घेताच त्याबाबत पवार यांनी समाधानही व्यक्त केले. 

पवार म्हणाले, "कोरोनाच्या संकटाचा सामाना एकत्रित करायचा आहे. रोज सापडणाऱ्या रुग्णांवर उपचार करताना, नव्या रुग्ण आढळून येणार नाहीत, यादृष्टीने कठोर नियोजन करा. या मोहिमेसाठी जिथे कुठे निधी लागेल, त्यासाठी मोकळेपणाने मागणी करा, पुरेशा प्रमाणात निधी पुरविण्यात येईल.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Woman Officer gives Corona Management tips to Ajit Pawar