

Bike Theft
बारामती - शहरातील मोटारसायकल चोरटयांचे धाडस कमालीचे वाढलेले असून थेट एका महिला पोलिसाचीच दुचाकी थेट बारामतीतील न्यायालयाच्या आवारातूनच चोरटयांनी चोरुन नेली. पोलिसांच्याच दुचाकी चोरीला जाऊ लागल्या तर सामान्यांनी काय करायचे असा प्रश्न बारामतीत उपस्थित केला जाऊ लागला आहे.