Velhe News : पाणी काढताना विहिरीत पडून चांदरला महिला गंभीर जखमी

राजगड तालुक्यातील दुर्गम चांदर येथे विहिरीतून पाणी शेंदताना तोल जाऊन पडल्याने आशा सांगळे या गंभीर जखमी झाल्या.
Woman Seriously Injured After Falling into Well

Woman Seriously Injured After Falling into Well

sakal

Updated on

वेल्हे - राजगड तालुक्यातील दुर्गम चांदर येथे विहिरीतून पाणी शेंदताना तोल जाऊन पडल्याने आशा अनिल सांगळे (वय-३४) या गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी (ता. १६) घडली असून, त्यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com