
Crime News : बारामतीमध्ये दारू विक्रेत्याकडून महिलेवर अत्याचार
माळेगाव : माळेगाव खुर्द ( ता. बारामती ) येथे अवैधरित्या दारू वितरण करणाऱ्याकडून दारू विक्री करणाऱ्या पस्तीस वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तालुक्यातील एका पीडित महिलेने आज दोघांविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पीडित महिला या गुरुवारी (ता. 26 जानेवारी) दुपारी 2 वाजता नवनाथ गव्हाणे यांच्याकडे दारू आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी गव्हाणे याने माळेगाव खुर्द हद्दी निरडावा कालव्यालगत असलेल्या बिल्डींगमधील एका फ्लॅटमध्ये दारु घेऊन जाण्यासाठी बोलावले.
त्यानुसार पीडित महिला सदर ठिकाणी गेली असता गव्हाणे याने सुरुवातीला तिच्या मनाविरुद्ध लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, तसेच जबरदस्तीने संभोग केला.
तसेच गव्हाणे याची पत्नी अश्विनी यांनीही संबंधित पिढीत महिलेवर अत्याचार होण्यासाठी मदत केली व घडलेला प्रकार सांगितल्यास सावकारकीची खोटी केस दाखल करील अशी धमकी दिली, तशी तक्रार पीडित महिलेने फिर्यादीमध्ये नमूद केली आहे.
उपलब्ध फिर्याद आणि प्रथम दर्शनी केलेल्या तपासाच्या आधारे माळेगाव पोलिसांनी संशयित आरोपी नवनाथ गव्हाणे व अश्विनी गव्हाणे (रा . माळेगाव खुर्द ( ता . बारामती ) ॲट्रॉसिटीसह बलात्कार करणे, धमकी देणे, आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत. आरोपी गव्हाणे फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकारी इंगळे यांनी दिली.