उरुळी कांचन - लग्नात दागिने घालावयाचे आहेत, अशी खोटी बतावणी करून मित्राकडून घेतलेले साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने एका खासगी फायनान्समध्ये गहाण ठेऊन १० लाख रुपये घेतले. मित्राने पुन्हा दागिने मागितल्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.