धक्कादायक! एका महिलेने चक्क पिरगळला महिला पोलिसाचा हात; कारण काय तर...

A woman twisted the hand of a female police officer in pune
A woman twisted the hand of a female police officer in pune
Updated on: 

पुणे : सिग्नल लागल्यानंतर दुचाकी झेब्रा पट्टीवर थांबविल्यामुळे वाहतूक महिला पोलिस कर्मचाऱ्याने कारवाईसाठी मोबाईलवर छायाचित्र फोटो काढल्याच्या रागातून दुचाकीस्वार महिलेने महिला पोलिस कर्मचाऱ्याचा हात पिरगळत शिविगाळ केली. संबंधीत महिलेस मुंढवा पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता मुंढवा चौकात घडली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनुया सोदे (वय २५, रा. भवानी पेठ  ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी ए. ए. दिवेकर यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी  महिला पोलिस कर्मचारी दिवेकर या सोमवारी सकाळी मुंढवा चौकात वाहतूक नियमन करीत होत्या. त्यावेळी सोदे ही तिच्या दुचाकीवर झेब्रा क्रॉसिंगवर उभी होती. त्यामुळे दिवेकर यांनी कायदेशीर कारवाईसाठी त्यांच्या मोबाईलमध्ये सोदे हिचे छायाचित्र काढले.  त्याचा राग आल्यामुळे अनुया यांनी दिवेकर यांचा हात पिरगळून त्यांना शिविगाळ केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रेजितवाड पंडीत करीत आहेत.

डॉक्‍टरांनो, आता खासगी दवाखान्यांवर गणेशोत्सव मंडळांची राहणार नजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hinjawadi Metro Parking Problem Persists Despite Rising Passenger Footfall :
YCM Hospital Drug Quality Issues: FDA Seizes Medicines Worth Rs 1.90 Crore
Pimpri Chinchwad Waste Management Issue Raised in Municipal General Body Meeting
Pune Zilla Parishad Organises Educational Study Tour to Delhi for Students