esakal | गणेशोत्सवाची खरेदी करून घरी निघालेल्या दुचाकीस्वार महिलेचा मृत्यु जखमी झालेल्या
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेचा मृत्यु

गणेशोत्सवाची खरेदी करून घरी निघालेल्या दुचाकीस्वार महिलेचा मृत्यु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सवासाठीचे साहित्य खरेदी करून घरी निघालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यु झाला. हि घटना मंगळवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास नगर रस्त्यावरील चंदननगर परिसरात घडली. या अपघातात सहप्रवासी महिलेस किरकोळ दुखापत झाली.

हेही वाचा: सोनाली कुलकर्णीच्या घरी गणरायाचं आगमन;पाहा व्हिडिओ

अनिता मंगेश विधाते (वय 31, रा. काळूबाईनगर, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. अनिता व त्यांची आई संगीता पांडुरंग जाधव (वय 52) या दोघीही मंगळवारी गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तुंची खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. खरेदी केल्यानंतर दोघेही दुचाकीवरुन वाघोलीकडे निघाल्या होत्या. विधाते या दुचाकी चालवित असतानाच त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली.

हेही वाचा: पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मास्कला हरताळ

या घटनेत त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच गुरूवारी रात्री ससून रुग्णालयात त्यांचा मृत्यु झाला. तर त्यांच्या आई संगीता जाधव यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.

loading image
go to top