मंचर - येथील गेटवेल हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीची व अत्यंत जोखमीची लेप्रोस्कोपिक (दुर्बिणीद्वारे) शस्त्रक्रिया तब्बल तीन तास केलेल्या प्रयत्नानंतर यशस्वी करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाच्या पोटात असलेली पावणे दोन किलो वजनाची २५ सेंटीमीटर व्यासाची मोठी गाठ व संपूर्ण गर्भाशय काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले.