Shirur News : घोडनदीच्या पूलावरून पात्रात उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

शिरूरजवळ सतरा कमानीच्या पूलावरून घोडनदीच्या पात्रात उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह हिंगणी जवळील सोनलकर वस्ती येथे नदीपात्रात आला आढळून.
Asha Botkar

Asha Botkar

sakal

Updated on

शिरूर - शिरूरजवळ सतरा कमानीच्या पूलावरून घोडनदीच्या पात्रात उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह हिंगणी (ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर) जवळील सोनलकर वस्ती येथे नदीपात्रात आज आढळून आला. मृत महिलेजवळ असलेल्या पाकिटातील काही कागदपत्रे व फोटोवरून त्यांची ओळख पटली असून, कौटुंबिक कारणावरून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com