सदाशिव पेठेत खळबळ; बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

संबंधीत इमारत ही सासवडकर नावाच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे. संबंधीत इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे.

पुणे : नूतनीकरणाचे काम सुरू असलेल्या इमारतीमधील एका घराच्या बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह आढळला. महिलेचा दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असून घरातून दुर्गंधी आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. सदाशिव पेठेमध्ये ही घटना घडली आहे. 

मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 971, सदाशिव पेठ येथे दत्तकृपा नावाची इमारत आहे. संबंधीत इमारत ही सासवडकर नावाच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे. संबंधीत इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे सासवडकर कुटुंब दुसरीकडे राहण्यासाठी गेले आहेत.

पुण्यासाठी सोमवार ठरला 'अपघातवार'; ६ तासात झाले ६ अपघात​

सासवडकर कुटुंबातील एक व्यक्ती सोमवारी सायंकाळी नूतनीकरणाचे काम पाहण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांना इमारतीमधील एका घराच्या बाथरुमधून दुर्गंधी येत होती. त्यामुळे ते बाथरुमच्या दिशेने गेले, तेव्हा त्यांना तेथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण कळू शकेल, असे टिकोळे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: womans body was found in bathroom of a building under renovation work in Sadashiv Peth Pune

Tags
टॉपिकस
Topic Tags: