esakal | Womans Day 2021 : रुपालीच्या यशस्वी बिझनेसचा 'अंडे का फंडा'; मोठ्या पगाराच्या नोकरीला दिला नकार
sakal

बोलून बातमी शोधा

MBA Rupali Jadhav Business Pune Anda bhurji

रुपाली आठवीमध्ये असल्यापासून तिच्या मामाच्या अंडा भुर्जीच्या व्यवसायामध्ये मदत करते. मामाकडूनच ती हा व्यवसाय कसा चालवायचा शिकली. 2013 साली मामाच्या निधनानंतर सर्व जबाबदारी रुपालीच्या खांद्यावर पडली. शिक्षण घेत तिने अंडा भुर्जीचा व्यवसाय सुरु ठेवायचा निर्णय घेतला.

Womans Day 2021 : रुपालीच्या यशस्वी बिझनेसचा 'अंडे का फंडा'; मोठ्या पगाराच्या नोकरीला दिला नकार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यातील रुपाली जाधव या उच्चशिक्षित तरुणीने मोठ्या पगाराची नोकरी नाकारून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला आहे. रुपाली ही अंडा भुर्जीची गाडी चालवत असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद तिला मिळत आहे. डेक्कन परिसरात रुपाली एकटीच महिला व्यावसायिक आहे. त्यामुळे महिलांनी व्यवसायात उतरण्याचे हिम्मत मिळत आहे. 

रुपाली आठवीमध्ये असल्यापासून तिच्या मामाच्या अंडा भुर्जीच्या व्यवसायामध्ये मदत करते. मामाकडूनच ती हा व्यवसाय कसा चालवायचा शिकली. 2013 साली मामाच्या निधनानंतर सर्व जबाबदारी रुपालीच्या खांद्यावर पडली. शिक्षण घेत तिने अंडा भुर्जीचा व्यवसाय सुरु ठेवायचा निर्णय घेतला.

नोकरीपेक्षा जास्त नफा व्यवसायामध्ये आहे हे रुपालीला समजले होते. त्यामुळे एबीएचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरीपेक्षा व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी तिने प्रयत्न केले. घरच्यांनीही तिच्या या निर्णयाला साथ दिली. तिच्या प्रयत्नांना हळू हळू यश प्राप्त झाले. आज पुण्यात तिने अंडा भुर्जीचे 3 आऊटलेट सुरु केले आहेत. या व्यवसायामधून तिने चांगला नफा कमावला. एवढेच नव्हे तर ती दुबई, मलेशिया, नेपाळ, थायलंड सारख्या देशांमध्ये फिरुन आली आहे. रुपालीने आजीलाही दुबई भ्रमंतीसाठी आवर्जुन पाठविले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

रुपाली सांगते की, ''आमच्याकडे खुप जुने ग्राहक आहेत ज्यांनी मला या दुकानात काम करताना पाहिलंय, अभ्यास करताना पाहिलयं, ज्यांना माझ काम माहित आहे, माझ शिक्षण माहित आहे. त्यामुळे त्यांनी मला नोकरीसाठी विचारणा केली होती पण मी त्यांना नकार दिला कारण मला हाच आमचा फॅमिली बिझनेसच पुढे न्यायचा होता.''

loading image
go to top