
पुणे : ‘‘महिला अत्याचाराच्या घटना घडतात, त्याचा खटला चालतो. पण महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटनांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लावण्याचा विचार सुरू आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. विधी व न्याय विभागाला कायदेशीर बाबी तपासण्यास सांगितले आहे,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.