दिव्या चव्हाण यांना मी अहिल्या होणार ग चा मान

दिव्या चव्हाण यांना मी अहिल्या होणार ग चा मान

Published on

MLS26B02541
माळशिरस : विजेत्या महिला स्पर्धकांच्या सन्मानप्रसंगी मान्यवर.
........
दिव्या चव्हाण यांचा सन्मान
........
माळशिरस : श्रीनाथ विद्यालय ज्युनिअर कॉलेज, महात्मा फुले विद्यालय व चंदुकाका सराफ (अकलूज) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेत ‘मी अहिल्या होणार ग’चा मान दिव्या चव्हाण यांना मिळाला आहे. त्यांना महेश क्लॉथ सेंटर यांच्याकडून पैठणी, मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात नगराध्यक्ष प्राजक्ता ओहोळ, उपनगराध्यक्ष अर्चना देशमुख, नगरसेविका ताई वावरे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून करण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये प्रथम डोक्यावर पेला ठेवणे स्पर्धेत काजल मदने, बॉटल भरणे स्पर्धेत दिव्या चव्हाण, संगीत खुर्ची स्पर्धेत सुनीता चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर लकी विजेता म्हणून वैष्णवी शिंदे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यानंतर सर्व स्पर्धेतून प्रथम आलेल्या विजेत्यांमधून प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली यामध्ये दिव्या चव्हाण यांना ‘मी अहिल्या होणार’चा मान मिळाला. या कार्यक्रमासाठी अप्पासाहेब देशमुख, अनिरुद्ध शिंगाडे, रावसाहेब देशमुख, हमीद मुलाणी, माया पिंगळे, रूपाली वाघमोडे, पल्लवी वाघमोडे, ललिता पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com