
उंड्री : वाहतूक कोंडीच्या प्रश्नाने वडाचीवाडीमध्ये पुन्हा डोके वर काढले आहे. येथील खडी वाहतूक करणाऱ्या डंपरपासून गावाची मुक्तता करावी, अशी महिलांकडून प्रशासनाला साद घालण्यात येत आहे. तातडीने प्रश्न मार्गी न लागल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.