इंदापूर तालुक्यातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

प्रा. प्रशांत चवरे
Thursday, 30 April 2020

इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन येथील पहिल्या कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या महिलेचा मृ्त्यू झाला असल्याची माहिती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. 

भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन येथील पहिल्या कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या महिलेचा मृ्त्यू झाला असल्याची माहिती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. मंगळवारी (ता.२८) भिगवण स्टेशन येथील महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती व त्यानंतर लगेचच गुरुवारी (ता.३०) दुपारी कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर तालुक्यामध्ये मंगळवारी (ता.२८) ला भिगवण स्टेशन येथील ६० वर्षीय महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. सदर महिलेवर पुणे येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. बुधवारी सदर महिलेस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी रुग्णाची तब्येत आणखी बिघडली. त्यानंतर दुपारी सदर महिलेचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

एका बाजूला महिलेच्या संपर्कातील 22 व्यक्तींपैकी 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे इंदापूर व भिगवणकरांना दिलासा मिळाला होता. दुपारी महिलेच्या मृत्यूची बातमी आल्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Women died due to Coronavirus in Indapur Taluka