शाळेत मुलींना महिला सप्ताह निमित्त पोलीसांचे मार्गदर्शनपर.....
VRG26B06271
सासुरे फाटा (वैराग) ः अर्णव शैक्षणिक संकुल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुंदन गावडे.
आपले साहस हीच खरी सुरक्षा ः कुंदन गावडे
वैराग : महिलांना आणि मुलींना कायद्याने विविध प्रकारचे संरक्षण दिलेले असले, तरी स्वतःच्या स्वभावात धैर्य आणि साहस निर्माण करणे गरजेचे आहे. मनात धैर्य असेल तरच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे बळ मिळते आणि अशा घटना पोलिस स्टेशनपर्यंत पोचतात. त्यामुळेच अन्याय करणाऱ्यांमध्येही भीती निर्माण होते, असे प्रतिपादन वैरागचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी केले. अर्णव शैक्षणिक संकुल, सासुरे फाटा (वैराग) येथे महिला सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांनी पोक्सो कायद्यातील तरतुदी, घरगुती हिंसाचार, सायबर क्राईम तसेच रस्ता सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांनी त्यांना निर्भयपणे आपले विचार मांडण्यास प्रवृत्त केले. मुलींच्या मनात भीती नसल्यास त्या शिक्षणात अधिक चांगली प्रगती करू शकतात, असे सांगताना करिअरची अनेक क्षेत्रे मुलींसाठी खुली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका अर्चना डिसले, दीपाली देशमुख, प्रशांत चव्हाण, गोपाळ सर, पोलिस कॉन्स्टेबल किसन कोलते, हर्षा काकडे, निलोफर पठाण, हिम्मत ढेंगळे, राजकन्या बचुटे, रोहिणी पाटील तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

