

KOE26B00996
कोळा (ता. सांगोला) येथील विद्या मंदिर इंग्लिश मेडीयमतर्फे आयोजित माता-पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना ॲड. अरुणा सुतार यावेळी समोर उपस्थित महिला.
महिलांना एक दैवी शक्ती मिळालेली आहे.
ॲड. अरुणा सुतार; कोळा विद्या मंदिरात माता-पालक मेळावा
...........
कोळा, ता. २९ : महिलांना एक दैवी शक्ती मिळालेली आहे, महिला अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्या घराची सुद्धा काळजी घेत असते असे प्रतिपादन ॲड. अरुणा सुतार यांनी केले.
कोळा विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या माता-पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य श्रीकांत लांडगे, डॉ. राजश्री कुलकर्णी, पर्यवेक्षक चारूदत्त जगताप, मुख्याध्यापक विनोद देशमुख उपस्थित होते.
सुतार पुढे म्हणाल्या, की आपल्या मुलांमध्ये संस्कार करण्याची पूर्णपणे जबाबदारी पालकांची आहे यामध्ये आपण जसे राहतो, वागतो याचा परिणाम मुलांमध्ये होत असतो त्यामुळे मुलांना संस्कार देताना आपण काम करीत असताना सुद्धा सकारात्मक बोलले पाहिजे, मुलांना लहान वयातच प्रत्येक बाबींची जाणीव व सवय लावली पाहिजे. तसेच हळदी-कुंकू सारखे कार्यक्रम नेहमी घेणे आवश्यक आहे यामुळे महिलांना वेगवेगळ्या विषयाचे मार्गदर्शन लाभते.
यावेळी डॉ. राजश्री कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षकांमधून अलका कोळेकर, वैशाली मोहिते तसेच पालकांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अस्मिता माळी, महानंदा देशमुख यांनी केले तर राजश्री देशमुख यांनी आभार मानले. यावेळी कोळा विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमधील महिला उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.