कायद्याचे ज्ञान तरच महिला साक्षम.

कायद्याचे ज्ञान तरच महिला साक्षम.

Published on

NRK26A00647
ढोकबाभूळगाव (ता. मोहोळ) : येथे जिल्हा परिषद काकडेवस्ती शाळेत आयोजित माता पालक मेळाव्याचे बक्षीस वितरण करताना ॲड. सुचिता इवरे, ॲड. श्रीदेवी काटे, जयश्री धावणे व महेश कोटीवाले.
---
महिला सक्षमीकरणासाठी कायद्याचे ज्ञान गरजेचे
ॲड. सुचिता इवरे-वनकळसे; काकडे वस्ती शाळेत माता-पालक मेळावा
सकाळ वृत्तसेवा
नरखेड, ता. ७ : स्त्रियांनी केवळ लिहिणे-वाचणे इतपत साक्षर न राहता कायद्याचे ज्ञान आत्मसात करून स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे; तरच खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण होऊ शकते, असे प्रतिपादन ॲड. सुचिता इवरे- वनकळसे यांनी केले.
मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वडवळ (ता. मोहोळ) केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काकडे वस्ती (ढोकबाभूळगाव) येथे महिला सक्षमीकरण सप्ताहानिमित्त आयोजित विशेष माता-पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी साहेबराव काकडे, शिवाजी काकडे, संभाजी काकडे, राजाराम पांढरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल काकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत भोसले, माजी अध्यक्ष कालिदास लोमटे, माजी मुख्याध्यापिका जयश्री धावणे आदी उपस्थित होते.
द्वितीय सत्रात मोहोळ पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल मालती देशमुख यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, मुले अनुकरणप्रिय असल्याने पालकांनी वाचनाची सवय लावली तरच मुलांमध्येही वाचनाची आवड निर्माण होते. मोबाईल हे दुधारी शस्त्र असून, त्याचा योग्य व अयोग्य वापर याची जाणीव पालकांनी लहान वयातच मुलांना करून द्यावी.
मेळाव्यात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना ॲड. इवरे व ॲड. श्रीदेवी काटे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक महेश कोटीवाले यांनी केले, तर आभार महेश टोणपे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com