महिला सक्षमीकरणाच्या योजनांनी बदलले महिलांचे आयुष्य – चित्रा वाघ
सक्षमीकरणाच्या योजनांनी बदलले महिलांचे आयुष्य
चित्रा वाघ; वाठार किरोलीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ महिला मेळावा
रहिमतपूर, ता. ३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात महिला सक्षमीकरण व सशक्तीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला. बाईचे बाईपण आणि आईचे आईपण जपण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ योजनेमुळे मुलींचे साक्षरतेचे प्रमाण वाढले असून, मुलींची संख्या देखील वाढली आहे. महिला सक्षमीकरणाच्या योजनांनी महिलांचे आयुष्य बदलले असल्याचे राज्य महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले.
वाठार किरोली जिल्हा परिषद गट व गण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वाठार किरोली येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी स्वाभिमानी महिला मंच अध्यक्षा समता घोरपडे, महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा उपाध्यक्षा चित्रलेखा माने, रहिमतपूरच्या नगराध्यक्षा वैशाली माने, शैलजा पाटील, अनिता गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या.
वाठार किरोली जिल्हा परिषद गटासाठी श्वेता गायकवाड, वाठार किरोली गणासाठी संध्या मलवडकर, तर आर्वी गणासाठी आनंद साबळे हे उमेदवार असून, त्यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा झाली.
त्या म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम सुरू आहे. राज्यात तीन हजार महिला सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात येणार असून, त्याचा शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होणार आहे. महिलांना सर्व सेवा घरपोच मिळणार आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी ११२ या हेल्पलाइनचा वापर करावा.’’
लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पाहात आहेत. तब्बल तीन कोटी लखपती दीदी घडवण्याचा सरकारचा संकल्प आहे. लेकराच्या नावापुढे मातेचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. ज्यांच्यामागे महिला उभ्या राहतात, त्यांचा क्रमांक नेहमी पहिला असतो.’’
-------------------------------
चौकट
आमदार घोरपडेंचे कौतुक
पाण्यासाठी चाळीस वर्षे प्रतीक्षा करावी लागलेल्या भागात आमदार मनोज घोरपडे यांनी अवघ्या एका वर्षात पाणी आणल्याचा उल्लेख करत चित्रा वाघ यांनी त्यांचे कौतुक केले. आजच हणबरवाडी- धनगरवाडी योजनेतून पाणी सोडण्यात आले असून, आर्वी, नागझरी, जयपूर, पिंपरी, पवारवाडी आदी गावांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
----------------------------
01609
वाठार किरोली : येथे महिला मेळाव्यात बोलताना चित्रा वाघ.
-----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

