पंढरपूर नगरपालिका माझा प्रभाग -माझे व्हिजन
UPR26B07500
महिला सक्षमीकरणार भर देणार
पंढरपूर : माझा प्रभाग क्रमांक १५ हा दोन गटांमध्ये विभागाला आहे, एक उच्चभ्रू लोकवस्ती तर दुसरा कामगार वसाहत. प्रभागात विस्थापित लोकांचे पुनर्वसनही झाले आहे. प्रभागाचा समतोल विकास साधण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. विस्तीर्ण असलेल्या प्रभागात अनेक नगरांचा समावेश आहे. येथील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छता ठेवणे यासाठी प्राधान्य देण्याचा सुरवातीपासूनच विचार आहे. प्रभागातील महिला सक्षमीकरणावर भर दिला जाईल. याशिवाय गार्डन तयार करून तेथे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. येत्या वर्षभरामध्ये अंतर्गत रस्ते आणि पथदिव्यांच्या कामांना प्राधान्य देणार आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. शिवाय इतर माध्यमातून देखील प्रभागात निधी खेचून आण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्याच्या दृष्टीने प्रभागात नगरपालिकेचा दवाखाना सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. प्रभागात अद्ययावत स्वीमिंग टॅंक, जॉगिंग ट्रॅक, मेडिटेशन सेंटर, योगा सेंटर, बॅडमिंटन कोर्ट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महिलांच्या हाताला काम देण्यासाठी गृह उद्योग सुरू करण्यात येणार आहे. यासाठी काही कंपन्यांशी बोलणी सुरू आहे.
- स्मिता फत्तेपूरकर, नगरसेविका, पंढरपूर
---
UPR26B07501
सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी प्रयत्न
पंढरपूर : माझ्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी लोक मोठ्या संख्येने राहतात. येथील सर्वसामान्य लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच प्रभागामधील सर्व महिलांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्याचा विचार आहे. त्यातून गरीब लोकांवर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. बरोजगारीची समस्या मोठी आहे. प्रभागातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा घेण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम करणार आहे. प्रभागातील सर्व रस्ते धूळमुक्त करण्यावर अधिक भर दिला जाईल. शिवाय येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी आध्यात्मिक केंद्र सुरू करणार आहे. पथदिवे, स्वच्छता या गोष्टींवर भर राहणार आहेच, शिवाय प्रभागात लहान मुलांसाठी गार्डन तर ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रभागातील गोरगरीब महिला व वंचित घटकातील महिला, तरुणांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी विविध योजना आणि प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रधान्य दिले जाणार आहे.
- प्रतीक्षा शिरसट, नगसेविका, पंढरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

