
पुणे : ‘‘देशात दरवर्षी सहा लाख, तर महाराष्ट्रात ५३ हजार मुलींची जन्माला येण्यापूर्वीच हत्या होते. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियानाला प्रतिसाद मिळाला असला, तरी ते तितके यशस्वी झाले नाही. त्यामुळे आमच्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार २०२७ च्या जनगणनेतही देशातील मुलींची संख्या समाधानकारक नसेल,’’ अशी चिंता ‘लेक लाडकी अभियान’ आणि दलित महिला विकास संस्थेच्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी गुरुवारी व्यक्त केली.