पांगरखेल (ता. खटाव) : ‘सुयोग महिला शेतकरी गट’

पांगरखेल (ता. खटाव) : ‘सुयोग महिला शेतकरी गट’

Published on

शेती खर्च कमी करण्‍यासाठी
महिलांनी घडवलेला ‘सुयाेग’

पांगरखेल गावातील समूह शेतीची यशाेगाथा ठरतेय प्रेरणादायी

ऋषिकेश पवार : सकाळ वृत्तसेवा
तीन वर्षांपूर्वी पांगरखेल (ता. खटाव) गावातील ११ महिला आपल्या शेतीचा खर्च कमी करण्यासाठी एकत्र आल्या. त्यांनी गटातील सर्व सदस्यांच्या शेतातील खुरपणी, कोळपणी, औषध फवारणी इत्यादी कामे इर्जिक (वारंगुळा) पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यातून पुढे एक नवा विचार जन्माला आला. शेतीपुरतेच नव्हे, तर शेतीपूरक व्यवसायातही एकत्र पुढे जायचे त्यांनी ठरविले.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील या महिला शेतकरी गटाची जिद्द पाहता त्यांना उद्योजक बनविण्यासाठी टाटा बायफ कंपनीने मदत केली. कंपनीने सुरुवातीला या महिला शेतकऱ्यांना जैविक औषध निर्मितीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले. औषधांच्या विक्रीतून चांगला नफा मिळून महिलांना आर्थिक फायदा होऊ लागला.
सुरुवातीला टाटा बायफ कंपनी व गटातील सदस्यांनी मिळून दोन लाख रुपये भांडवल औषध निर्मितीसाठी उपलब्ध केले. सध्या जैविक निविष्ठा औषध निर्मितीतून गटाला चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. या माध्यमातून सर्व महिला आर्थिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे यश पूर्णपणे त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.
सध्‍या स्मार्ट सखी, पाणी फाउंडेशन व टाटा बायर्स अशा मित्र संस्थांबरोबर सुयोग महिला शेतकरी गट काम करत आहे. पाणी फाउंडेशन अंतर्गत तालुका स्तरावर या गटाने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

.......................................

गटामुळे आलाे एकत्र
आमच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे. आधी आम्ही घराबाहेर फारसं पडत नव्हतो. गटामुळे आम्ही एकत्र आलो, चर्चा करू लागलो आणि शेतीत निर्णय घ्यायला लागलो. त्या कामातून आत्मविश्वास आला. पुढे निविष्ठांचा उपक्रम सुरू केला आणि आज आम्हाला स्वतःची एक वेगळी ओळख तयार झाल्यासारखं वाटतं असल्याचं गटातील महिला सदस्यांनी सांगितले.

.......................................

सुयोग महिला शेतकरी गट :
अध्यक्षा : संगीता जगताप
उपाध्यक्षा : मंदाकिनी जगताप
सचिव : आरती जगताप
सदस्या : प्राजक्ता जगताप, अर्चना जगताप, उषा जगताप, सविता जगताप, संध्या जगताप, जयश्री जगताप, कल्पना जगताप, मीना जगताप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com