पुणे : खडकीत झाड कोसळल्याने महिलेेचा तुटला पाय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

बुधवारी (ता.25) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास खडकी येथील न्यायालयाच्या आवारातील एक झाड अचानक कोसळले. झाडाखाली बसलेली एक महिला झाड पडल्याचा आवाज ऐकून पळताना झाडाखाली महिला सापडल्यामुळे महिला गंभीर जखमी होऊन तिचा उजवा पाय तुटून पडला. न्यायालयातील वकिलांनी महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले असून महिलेच्या पायाची शस्त्रक्रिया सुरू आहे. 

खडकी बाजार : खडकी येथील न्यायालयाच्या आवारात झाड पडून एक महिला गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेत तिचा उजवा पाय तुटून पडला. गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत.

बुधवारी (ता.25) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास खडकी येथील न्यायालयाच्या आवारातील एक झाड अचानक कोसळले. झाडाखाली बसलेली एक महिला झाड पडल्याचा आवाज ऐकून पळताना झाडाखाली महिला सापडल्यामुळे महिला गंभीर जखमी होऊन तिचा उजवा पाय तुटून पडला. न्यायालयातील वकिलांनी महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले असून महिलेच्या पायाची शस्त्रक्रिया सुरू आहे. 

सुकेशीनी तुपलोंढे (वय 28,रा.पिंपळे गुरव) या खडकी न्यायालयात नोकरीस आहेत. त्या जेवणाच्या सुटीत जेवण करून न्यायालय परिसरात असलेल्या झाडाच्या ओट्यावर बसल्या होत्या. अचानक झाड पडते आहे हे लक्षात येताच त्यांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र थोडे पुढे जाताच झाड त्यांच्या अंगावर पडून त्या झाडाखाली दबल्यामुळे त्यांचा उजवा पाय तुटला. सहकाऱ्यांनी त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पायाची शास्त्रीक्रिया सुरू असल्याची माहिती न्यायालयातील वकील, सुनील जपे यांनी दिली.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The women leg broken due to tree collapse at khadaki in pune