लष्कराच्या तिन्ही दलांत महिला अधिकाऱ्यांचाही ‘जोश’

Women-in-Army
Women-in-Army

पुणे - पुरुषांच्या बरोबरीने महिला सर्वच क्षेत्रांत अग्रेसर झाल्या आहेत. त्याला सैन्यदलही अपवाद नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत लष्काराच्या तिन्ही दलांमध्ये विविध पदांवर महिला कार्यरत झाल्या असून, अधिकारी पदावरूनही त्या आपला ठसा उमटवू लागल्या आहेत. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवरून सैन्यदलात (भूदल) महिला अधिकाऱ्यांचा ‘जोश’ वाढल्याचे स्पष्ट होत आहे. राजपथावर आज होणाऱ्या संचलनाचे नेतृत्व सलग दुसऱ्यांदा महिला अधिकाऱ्याकडे आले आहे, यावरून ही बाब अधोरेखित होत आहे.

लष्करात मुलींच्या भरती होण्याचे प्रमाण वाढत आहे. २०१६ मध्ये भूदल, नौदल आणि वायुदलात मिळून २२१ महिलांची अधिकारीपदी निवड झाली होती. त्यामध्ये सर्वाधिक १०८ महिला अधिकारी वायदुलात नियुक्त झाल्या होत्या. गेल्या तीन वर्षांत नौदलात मात्र अधिकारीपदी निवड होणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण कमी झाले असून, सैन्यदलातील अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या ‘पीआयबी’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. लष्करात अधिकारी पदावर काम करण्याची इच्छा आणि स्वप्न तरुणी बाळगतात. परंतु योग्य मार्गदर्शन आणि अपुऱ्या माहिती यामुळे त्यांना संधी मिळत नाही. पदवी नंतर लष्करात मुलींसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर यांनी दिली.

मुलींसाठी लष्करात सध्या ‘एनसीसी’, टेक्‍निकल आणि ‘लॉ’च्या एन्ट्रीसाठी प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज भरण्यासाठी www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळावर भेट द्यावी.

लष्कराच्या तीनही दलांमध्ये जाण्यासाठी मुलींना ६ ते ७ पर्याय आहेत. भूदलात जाण्यासाठी ‘यूपीएससी’, ‘एनसीसी’, ‘टेक्‍निकल’ आणि ‘लॉ’ या चार प्रकारे मुलींना लष्करात प्रवेश करणे शक्‍य आहे. 
- प्रदीप ब्राह्मणकर, लेफ्टनंट कर्नल (निवृत्त)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com