अपात्र लाडक्‍या बहिणींच्‍या मेळाव्‍यास प्रतिसाद

अपात्र लाडक्‍या बहिणींच्‍या मेळाव्‍यास प्रतिसाद
Published on: 

जनवादी संघटनेच्या मेळाव्‍यास प्रतिसाद

सातारा, ता. २ : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने नावे वगळलेल्या लाडक्या बहिणींचा जिल्हास्‍तरीय मेळावा सदरबझारमधील अजिंक्‍य कॉलनीत आयोजिण्‍यात आला होता.
मेळाव्‍यासाठी संघटनेच्‍या राष्ट्रीय उपाध्यक्ष मरियम ढवळे, आनंद अवघडे, प्रतिभा भोसले, रेहाना शेख, मनीषा सपकाळ, वंदना कांबळे, शशिकला बुधावले यांच्‍यासह इतर महिला मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होत्‍या.
केवायसीअभावी लाडक्या बहिणींचे पैसे बंद केल्‍याने उपस्‍थित माहिलांना शासनाच्‍या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवला. मरियम ढवळे यांनी महागाईमुळे महिलांना घर चालवणे जिकिरीचे होत असून, आधार बनलेली लाडकी बहीण योजनेतून नावे रद्द केल्याने अनेक महिला व त्‍यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत. या महिलांना त्‍या योजनेचा लाभ पूर्ववत मिळावा, यासाठी संघटना पाठपुरावा करत आहे. याच अनुषंगाने संघटनेने लाडकी बहीण योजनेतून वगळलेली नावे पुन्‍हा समाविष्‍ट करण्‍याची, केवायसीअभावी कमी केलेली नावे पुन्‍हा यादीत घ्‍यावीत, सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणी योजनेची रक्कम दोन हजार १०० करावी, थकित मानधन त्वरित बँक खात्यात जमा करावे, या मागण्‍या करण्‍यात आला आहेत. या मागणीसाठी गुरुवारी (ता. १५) जिल्‍हा परिषदेवर मोर्चा काढणार असू्न, त्‍यात जास्‍तीतजास्‍त महिलांनी सहभागी होण्‍याचे आवाहनही त्‍यांनी या वेळी केले.
.........
54427
सातारा : मेळाव्‍यास उपस्‍थित असणाऱ्या महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com