टेंभुर्णीतील लक्ष्मीआनंद विद्यामंदिर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला संरक्षण व हक्क कायदेविषयक कार्यशाळा

टेंभुर्णीतील लक्ष्मीआनंद विद्यामंदिर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला संरक्षण व हक्क कायदेविषयक कार्यशाळा

Published on

TMB26B03833
टेंभुर्णी ः महिला संरक्षण व हक्क कायदेविषयक कार्यशाळेत ॲड. अमृता वाघे, प्राचार्य विकास करळे व प्रशालेतील शिक्षिका.

महिला हक्क व संरक्षण कायद्यांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन

टेंभुर्णी, ता. १० : टेंभुर्णी येथील लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर या प्रशालेत महिला हक्क व संरक्षण कायदेविषयक कार्यशाळेचे घेण्यात आली. महिला सक्षमीकरण सप्ताह राज्यभर उत्साहात साजरा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

या कार्यशाळेस नूतन जिल्हा परिषद सदस्या ॲड. अमृता नागनाथ वाघे उपस्थित होत्या. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांनी महिलांचे हक्क, अधिकार व संरक्षण, शारीरिक-मानसिक छळ, लैंगिक शोषण व अत्याचार यांविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींनी अधिकाधिक सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे व सचिवा सुरजा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी नागनाथ वाघे, शाहिदा पठाण, प्राचार्य विकास करळे, पीआरओ सागर खुळे तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक गायत्री अडाणे यांनी केले. सूत्रसंचालन स्वरांजली काळे यांनी केले, तर पायल गायकवाड हिने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com