नगर येथील महिलेची वाघोलीत येऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

नगर जिल्ह्यातील नागापूर येथील विवाहित महिलेने वाघोली येथे येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. वाघेश्वर कॉम्प्लेक्स जवळील मैदानातील लोखंडी रॉडला तिने फास घेतला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

वाघोली - नगर जिल्ह्यातील नागापूर येथील विवाहित महिलेने वाघोली येथे येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. वाघेश्वर कॉम्प्लेक्स जवळील मैदानातील लोखंडी रॉडला तिने फास घेतला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

अश्विनी गणेश तांबे ( वय 28, रा. नागापूर, जिल्हा - नगर ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार ती आपल्या आई सोबत सोमवारी रात्री नागापूरहून पुण्याकडे निघाली. वाघोली येथे उतरल्यानंतर तिने आईला सोडून पळ काढला. आईने तिचा शोध घेतला. मात्र ती  न सापडल्याने ती परत नगरला गेली. दरम्यान अश्विनी हिने वाघेश्वर कॉम्प्लेक्स जवळील लोखंडी रॉड ला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी ट्रॅफिक नियंत्रण करणाऱ्या वॉर्डनला सांगितले. त्याने पोलीस ठाण्यात ही घटना कळविली. तिच्या कडे एक पर्स आढळून आली. त्यात आधार कार्ड, वाहन परवाना, डेबिट कार्ड व मोबाईल नंबर आढळून आला.

पोलिसानी त्या नंबर वर संपर्क साधून घटना कळविली. नागापूरहून नातेवाईक आल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला हलविण्यात आला. तिचे माहेर बीड जिल्ह्यातील शिरपूर येथील असून पती गणेश हे मुंबईला खाजगी नोकरी करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women suicide in wagholi