

टुडे ३ ॲंकर
( एआय चित्र वापरावे )
पर्यटन व्यवसायासाठी महिलांना १५ लाखांपर्यंत कर्ज
‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण : ४१ प्रकारच्या व्यवसायांना प्रोत्साहन
अहिल्यानगर, ता. ८ : महिलांमध्ये पर्यटन क्षेत्रातील उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना बँकेमार्फत १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार महिलांच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री निश्चित केली आहे. यामध्ये महिला उद्योजकता विकास, महिलांसाठी पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज्ड उत्पादने, सवलती, प्रवास व पर्यटन विकास यांचा समावेश आहे.
महिलेच्या मालकीचा व तिच्याकडून चालविला जाणारा पर्यटन व्यवसाय असणे आवश्यक आहे. तसेच व्यवस्थापकीय व इतर कर्मचाऱ्यांमध्ये किमान ५० टक्के महिला असणे बंधनकारक आहे. व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा आणि आवश्यक सर्व परवानग्या घेतलेल्या असाव्यात. लाभार्थी, पर्यटन व्यवसाय आणि कर्ज देणारी असावी. अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालयाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
---------
४१ प्रकारांचा समावेश
या योजनेअंतर्गत कॅरॅव्हेन, साहसी पर्यटन, पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, बेड अँड ब्रेकफास्ट, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, टेंट, ट्री हाऊस, पर्यटन व्हिला, कॉटेज, महिलाचलित कॉमन किचन, टुरिस्ट ट्रान्स्पोर्ट ऑपरेटर, मेडिकल टुरिझम यांसह ४१ प्रकारच्या पर्यटन व्यवसायांचा समावेश आहे.
----------
१२ टक्के मर्यादेपर्यंत व्याजाचा परतावा
योजनेत पात्र महिलेला बँकेकडून १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम १२ टक्के मयदित, सात वर्षांपर्यंत किंवा ४.५० लाख रुपयांपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत परत केली जाणार आहे.
--
अर्जदारांनी पर्यटन विभागाच्या ''आई'' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत ५० रुपयांचे प्रक्रिया शुल्क भरल्याची पावती, पासपोर्ट फोटो, ओळखपत्र, आधार व पॅन कार्ड, आधार लिंक बँक खात्याचे तपशील, व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा, मालकी हक्काचे दस्तऐवज, आवश्यक परवाने आणि ५०० शब्दांची प्रकल्प संकल्पना सादर करावी.
- विजय जाधव, उपसंचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.