पुरंदरमध्ये बचत गटातील महिलांना प्रशिक्षण

पुरंदरमध्ये बचत गटातील महिलांना प्रशिक्षण

Published on

सासवड, ता. ४ : पुणे जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग आणि नवी दिल्ली येथील एएफसी इंडिया लि. यांच्या वतीने, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत पुरंदर तालुक्यात दोन दिवसीय महिला प्रशिक्षण नुकतेच पार पडले. तालुक्यातील विविध गावांमधील सुमारे ३०० हून अधिक ग्रामसखी आणि बचत गटातील महिलांनी या प्रशिक्षणात सहभागी होऊन ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ असा संकल्प केला.
पुरंदरमधील २४ गावांचा एक ‘गण’ याप्रमाणे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार नीरा, परिंचे आणि सासवड (दोन ठिकाणी) अशा एकूण चार केंद्रांवर हे प्रशिक्षण पार पडले. यात प्रत्येक समूह गटातील दोन महिला प्रतिनिधी आणि ग्रामसखींचा समावेश होता.
यशदा येथून विशेष प्रशिक्षण घेऊन आलेले तज्ज्ञ प्रशिक्षक सूर्यकांत शिवले व कुंडलिक कोहिनकर यांनी महिलांना ​कचरा व्यवस्थापनात ओला व सुका कचरा विलगीकरण, ​सांडपाणी नियोजनामध्ये शोषखड्ड्यांचे महत्त्व आणि उभारणी, ​सार्वजनिक स्वच्छतामध्ये शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालयांची स्वच्छता राखण्यात महिलांचे योगदान, आणि स्वच्छतेबाबत समाजाची मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधन याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुरंदरच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र राबवण्यात आले. विस्तार अधिकारी बबन चखाले व संतोष नेवसे यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला, तर प्रिया गायकवाड व काजल गायकवाड यांनी नियोजन केले. प्रशिक्षणात सहभागी महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com