Women's Day 2019 : क्षमतांचा निरंतर शोध घेणारी अभिनेत्री

Ashwini-Giri
Ashwini-Giri

महिला दिन 2019  
‘हजार चौरासी की माँ,’ ‘श्वास,’ ‘ध्यासपर्व’ यांसारख्या चित्रपटांमधून आगळीवेगळी मुद्रा उमटवणाऱ्या अश्विनी गिरी या महाविद्यालयीन काळात राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू होत्या, याची आज रसिकांना कल्पनाही नसेल. आत्मभान व समाजभानामुळे आलेली अभिव्यक्तीतील समज नव्या पिढीकडे प्रशिक्षणातून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. 

नवीन संधी आली, की  ‘करून तर पाहू ’ या मनोधारणेतून मजल-दरमजल स्वत:च्या क्षमतांचा निरंतर घेतलेला शोध आणि विस्तारलेलं क्षितिज हे अश्विनी गिरी या अभिनेत्रीचं सार्थ वर्णन ठरू शकेल. 

अश्विनी सांगतात, ‘‘कामातून काम मिळत गेलं. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात शिकत असताना सहविद्यार्थी चित्तरंजन गिरींबरोबर सूर जुळले. नंतर आम्ही लग्न करून दोघांनीही यातच कार्यरत राहायचा निर्णय घेतला. मुंबईत राहून काही काळ काम केलं. मग पुण्यात. इथंही उत्तमोत्तम दिग्दर्शकांबरोबर मनाजोगतं काम करता येतं आहे म्हणून इथंच आम्ही स्थिरावलो. शिकवायची संधीही इथल्या वास्तव्यामुळेच आली.

विद्यार्थ्यांना शिकवताना लक्षात आलं, की प्रत्येकाचे संदर्भ वेगळे आहेत. मी शिकले ती तंत्रं यांच्यासाठी उपयुक्त ठरतीलच असं नाही. यातून नवं शोधत गेले. विद्यार्थ्यांना शरीर, श्वास, आवाजाचा वापर याचं जास्तीत जास्त भान देण्यासाठी काही थिएटर गेम्स शोधले. बरंच काम करीत राहिले. त्यातून अभिनेत्री म्हणून माझ्यातली सहजता प्रचंड वाढली. 

शरीराची तंदुरुस्ती जेवढी जास्त, तेवढंच मन लवचिक होऊ शकतं. यासाठी मी शिकलेलं मार्शल आर्ट वापरून प्रारूप तयार केलं. जगण्याविषयीचं भान प्रत्येकात असणं ते विकसित होत राहाणं फार गरजेचं आहे. त्यासाठी नाट्य-चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून कलावंत बरंच काही करू शकतात. यासाठी नवी पिढी सज्ज व्हावी, यासाठी हे प्रयत्न आहेत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com