PMP Bus
sakal
पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) महिला आणि पर्यटकांसाठी विशेष भेट जाहीर केली आहे. स्वारगेट मुख्य बस स्थानकावरून येत्या ८ मार्च रोजी ८ प्रसिद्ध पर्यटन मार्गांवर विशेष वातानुकूलित ई-बस सेवा सोडण्यात येणार आहेत. अवघ्या ५०० रुपयांत पर्यटकांना दिवसभर निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांची सफर घडणार आहे.