esakal | बारामती येथील महिला शासकीय रुग्णालय महिलांसाठी ठरले वरदान
sakal

बोलून बातमी शोधा

Pregnant

बारामती येथील महिला शासकीय रुग्णालय पंचक्रोशीतील महिलांसाठी वरदान ठरले आहे. सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे कोविड रुग्णालये झाल्याने विशेषतः गर्भवतींना सध्या याच रुग्णालयाचा आधार आहे. ऑगस्ट महिन्यात या रुग्णालयात उच्चांकी 431 प्रसूती झाल्या, त्यांपैकी 166 सिझेरियन आहेत.

बारामती येथील महिला शासकीय रुग्णालय महिलांसाठी ठरले वरदान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती - येथील महिला शासकीय रुग्णालय पंचक्रोशीतील महिलांसाठी वरदान ठरले आहे. सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे कोविड रुग्णालये झाल्याने विशेषतः गर्भवतींना सध्या याच रुग्णालयाचा आधार आहे. ऑगस्ट महिन्यात या रुग्णालयात उच्चांकी 431 प्रसूती झाल्या, त्यांपैकी 166 सिझेरियन आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून अवघ्या एक वर्षात या रुग्णालयाची इमारत उभी करण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यानंतर या रुग्णालयाला आवश्यक सुविधाही पुरविण्यात आल्या. जुलै 2015 पासून या रुग्णालयाचे कामकाज सुरु झाले. दरवर्षी या रुग्णालयात येणाऱ्या महिलांची संख्या सातत्याने वाढते आहे. गेल्या साडेपाच वर्षात या रुग्णालयात 1 लाख 51 हजार 627 महिलांनी उपचार घेतले आहेत. या मध्ये 15 हजार 724 प्रसूती झाल्या असून, त्यापैकी 5445 सिझेरियन प्रसूती आहेत. या दवाखान्यामध्ये रुग्णांना एक रुपयाचाही खर्च येत नाही. औषध, गोळ्या, इंजेक्शन, प्रसूती, भोजन, चहा, नाश्ता, प्रयोगशाळेतील तपासण्या, एक्स रे या सगळ्याच गोष्टी विनामूल्य केल्या जातात, हे याचे वैशिष्टय आहे. गर्भवतीस घरून रुग्णालयात आणणे व प्रसूतीनंतर पुन्हा रुग्णवाहिकेतून घरी पोहोचविण्याचे काम विनामूल्य होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासगी दवाखान्यात एका सिझेरियन प्रसूतीसाठी 40 ते 50 हजारांचा खर्च येतो. त्याचा विचार करता आतापर्यंत 13 कोटीहून अधिकची समाजाची बचत या दवाखान्यामुळे झाली आहे, तर साधारण प्रसूतीच्या माध्यमातून 20 कोटी रुपयांची, अशी एकूण 33 कोटी रुपयांचे उपचार रुग्णांवर या रुग्णालयाच्या माध्यमातून झालेले आहे. 

१ लाख ५१ हजार ६२७ - साडेपाच वर्षांत तपासलेल्या महिला रुग्णांची संख्या
१० हजार २७९ - साधारण प्रसूती झालेल्या महिलांची संख्या
५ हजार ४४५ - सिझेरियन प्रसूतीची संख्या

सिल्व्हर ज्युबिली, रुई रुग्णालय कोविडमुळे बंद आहेत. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती होत नाहीत. त्यामुळे बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यांतून महिला प्रसूतीसाठी बारामतीत येत आहेत. याशिवाय येथे मिळणारी विश्वासार्ह व उत्तम सेवा हेही संख्या वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.
- डॉ. बापू भोई, वैद्यकीय अधीक्षक, महिला ग्रामीण रुग्णालय, बारामती

Edited By - Prashant Patil