लोणावळ्यात महिलांसाठी आरोग्य जागृती कार्यक्रमास प्रतिसाद
लोणावळा, ता. १७ : लायन्स क्लब ऑफ लोणावळा व सूक्ष्म योगा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य जागृती कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाच्या विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम याबरोबर हार्मोनल असंतुलन, आहार व्यवस्थापन तसेच हृदयविकार यांसारख्या वाढत्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमात योग, झुंबा तसेच विविध आरोग्यविषयक उपक्रम घेण्यात आले. यावेळी सुमारे ९० महिलांची उपस्थिती होती.
या प्रसंगी नगरसेविका रेश्मा पाठारे यांच्या हस्ते सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. क्लबच्या अध्यक्षा साधना टाटिया, सचिव सारिका अग्रवाल, खजिनदार सुमीत भदेशिया तसेच ॲक्टिव्हिटी चेअरमन सारिका सुराणा यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

