स्त्रीवादी नांदी साहित्य संमेलन २४ ऑक्टोबरला होणार अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका डॉ. छाया महाजन

स्त्रीवादी नांदी साहित्य संमेलन
२४ ऑक्टोबरला होणार 
अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका डॉ. छाया महाजन
Published on: 

पुणे, ता. १७ ः महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन, राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग आणि स्त्री आधार केंद्र यांच्यातर्फे पुढील शनिवारी (ता. २४) स्त्रीवादी नांदी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील के. बी. जोशी सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे संमेलन होणार आहे.
विधान परिषदेच्या माजी उपसभापती व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे आणि ‘मसाप’चे अध्यक्ष योगेश सोमण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. याप्रसंगी ‘मसाप’च्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ९९ नांदी संमेलनांमधील हे १४ वे नांदी संमेलन असणार आहे.
या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ लेखिका डॉ. छाया महाजन भूषवणार आहेत. संमेलनाच्या उद्‍घाटन सत्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ लेखिका मल्लिका अमर शेख, मंगला गोडबोले आदी उपस्थित असतील. उद्‍घाटनानंतर दुपारी १.४५ ते ३ या वेळेत कवयित्री संमेलन आणि दुपारी ३ ते ४ या वेळेत ‘माध्यमातील स्त्रीवादाचा आविष्कार’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.
दुपारी ४.१५ ते ५.३० या वेळेत ‘मी का लिहिते?’ या सत्रातून लेखिकांचा सर्जनशील प्रवास, अभिव्यक्तीमागील प्रेरणा यावर संवाद होईल. समारोप सत्रात रेखा इनामदार-साने, डॉ. कांता नलावडे, स्वाती महाळंक आणि डॉ. गोऱ्हे विचार मांडतील. डॉ. छाया महाजन यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर संमेलनाचा समारोप होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com