
पुणे : महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने गुरुवारपासून (ता. १२) महिलांसाठी विशेष बसच्या मार्गात वाढ होणार आहे. सध्या १४ मार्गांवर महिलांसाठी राखीव बस धावत आहे, यात आणखी १९ नवीन मार्गांची भर पडणार आहे. त्यामुळे एकूण ३३ मार्गांवर महिलांसाठी विशेष बस धावणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी सोय होईल.